Maratha reservation : राजधानी मुंबईत मराठ्यांचे हाल! आझाद मैदानावर चिखल अन् पाण्याची डबकी; कशी काढली रात्र?

Maratha reservation : मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षणच्या लढ्याचा आजच दुसरा दिवस आहे. सरकारने आंदोलनसाठी मनोज जरांगेंना आठ तासांची वेळ दिली होती. मात्र, या वेळेत वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक बांधव मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. यामुळे आझाद मैदानावर मोठी गर्दी झाली आहे.
मुंबई महापालिकेने आझाद मैदानात केलेल्या व्यवस्थेवरून जरागेंनी महापालिकेच्या कारभावर संतप्त प्रतिक्रिया दिली. याशिवाय मराठा आंदोलकांनी देखील संताप व्यक्त केला. काल रात्री मुंबईच्या दक्षिण भागात पावसाची संततधार सुरू होती. काल रात्रीचा मुक्काम मराठा बांधवांनी आझाद मैदानाला लागून असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) इथं केला. मात्र, पावसामुळे आणि कोणतीही सुविधा न मिळाल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.
मुंबई महापालिकेने आझाद मैदानावर खडी आणि वाळू टाकली होती, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पावसामुळे आझाद मैदानावर चिखल अन् पाण्याची डबकी साचली आहेत. यामुळे आता या चिखलात मराठा आंदोलक आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कसे बसणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
खाण्याचेही प्रचंड हाल
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी आग्रही भूमिका मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता सरकारचं टेन्शन वाढलं आहे. काल मोठ्या प्रमाणावर आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबईच्या फ्री वेव येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. परिणामी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. खालगल्ली बंद असलेल्याने आंदोलकांचे खाण्याचेही प्रचंड झाले आहेत. यामुळे आता मुंबई महापालिकेकडून आंदोलकांची व्यवस्थाबाबत काही निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.





