Satara | जावळी तालुक्यातील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले

पाचगणी, (प्रतिनिधी) – जावळी तालुक्यातील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. आमदार या नात्याने दुर्गम जावळी तालुक्यात नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामे केली आहेत. शाश्वत विकासकामे व जनतेचे प्रेम यामुळे निवडणुकीचा फारसा विचार करत नाही.
आसनी हे गाव छोटेसे असले तरी हे गाव कायम पाठीशी उभे राहिले असल्याने येथील सर्व विकासकामे पूर्ण केली असून उर्वरित कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
आसनी, ता. जावळी येथे दोन कोटी हून अधिक रुपयांची विकासकामे आमदार निधीतून मार्गी लावल्याबद्दल आसनी ग्रामस्थांनी नुकतीच आमदार भोसले यांची सातारा येथील सुरुची निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी सरपंच संजना शेलार, उपसरपंच सूर्यकांत शेलार, सूर्यकांत शेलार, वैशाली शेलार, जगन्नाथ शेलार, युवा नेते सागर धनावडे यांच्यासह ग्रामस्थ, युवक, महिला उपस्थित होत्या.यावेळीआसनी गावासाठी भरीव विकासनिधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार भोसले यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सागर धनावडे यांनी म्हणाले, आमदार भोसले यांच्या आमदार निधीतून व जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सहकार्याने आसनी मध्ये दोन कोटी ३५ लाख रुपये विकासकामांसाठी उपलब्ध झाला आहे.
यामध्ये आशीलमाल मंदिर परिसरात कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनासाठी एक कोटी रुपये निधीची तरतूद केली असून या कामासाठी ३० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.
संपूर्ण गावात बंदिस्त गटार, मंदिर रस्ता ४० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. घरोघरी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ६० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
या वर्षात आशीलमाल मंदिर रंगकाम ,परिसर सुशोभीकरण व काँक्रीटी करणासाठी २० लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी १२ लाख रूपये, स्मशानभूमी वेटिंग शेडसाठी ३ लाख रुपये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपलब्ध करून दिला आहे.
आसनीसह केळघर विभागातील प्रत्येक गावात भरीव विकासनिधी उपलब्ध झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी आमदार भोसले यांचे आभार मानले आहेत .





