Parli Assembly constituency: यंदा निवडणुकीचा पॅटर्न बदलला – धनंजय मुंडे

बीड – राज्यातील बारामतीसह बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाकडेही ( Parli Assembly constituency) राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) रिंगणात आहेत.
धनंजय मुंडे हे स्वतः राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आणि बहीण पंकजा मुंडे भाजपच्या स्टार प्रचारक असल्याने दोघा बहिण भावांच्या संयुक्त सभा मतदार संघात पार पडल्या आहेत. मात्र, एकाही बड्या नेत्याची सभा झालेली नाही. ( Maharashtra Assembly Election 2024)
त्यामुळे परळीची राज्यात चर्चा सुरू असताना परळीत मात्र शांतता आहे. रॅली नाही अर्ज दाखल करण्याच्या दिवशी रॅली नाही. फार सभा नाही पण मायबाप जनतेला विश्वास आहे. यंदा, मीच ठरवले आहे, ही निवडणूक सायलेंटली कोणताही गाजावाजा न करता लढवायची, यंदा निवडणुकीचा पॅटर्न बदलला असल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले.





