बारामती शहरात 41 दिवसांनंतर सापडला बाधित रुग्ण
Updated On:

बारामती( प्रतिनिधी) – शहरातील तांदुळवाडी परिसरातील एका तरुणास कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. बारामतीतील हा चौदावा कोरोनाग्रस्त ठरला आहे. बारामती शहरात तब्बल 41 दिवसानंतर कोरोनाचा रुग्ण सापडलाआहे.
तांदुळवाडी परिसरातील कल्याणीनगर येथेल तीस वर्षीय तरुणास कोरोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण पुण्याहून बारामतीला आला आला होता. त्याच्यावर बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तांदुळवाडी येथील पाच किलोमीटर परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न राबवून बारामती शहर कोरोना मुक्त शहर करण्यात आले होते मात्र 41 दिवसांनंतर बारामतीत 30 वर्षीय तरुणास कोरोनाची लागण झाली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शहरातील पहिली घटना आहे.





