Local Body Election Result | राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाची घोषणा झाली आहे. महायुतीतील पक्षांनी यात शानदार विजय मिळवला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महायुतीने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. तर भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला. मात्र असे असताना दुसरीकडे, सांगलीतील तासगाव निवडणुकीत भाजपच्या संपूर्ण पॅनलचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तासगावच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदांची निवडणूक लढणाऱ्या सर्व उमेदवाराचे डिपॉझिटच जप्त झाल्याने भाजपला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटलांना डावलल्याने भाजपचा पराभव झाल्याचे सांगितले जात आहे. याद्वारे तासगावमधील भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. स्वप्नील पाटील यांचा राजीनामा घेण्याची मागणी संदीप गिड्डे पाटील यांना डावलून ग्रामीण मंडल अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी काहीही संबंध नसताना तासगाव नगरपालिका निवडणूकीत पूर्ण हस्तक्षेप केला. यामुळे या पराभवाला भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील जबाबदार असून त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी भाजप पदाधिकारी आणि भाजप उमेदवारांकडून करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करून मागणी करणार असल्याची माहिती यावेळी भाजप पदाधिकारी यांनी केली आहे. Local Body Election Result | संपूर्ण पॅनेलचे डिपॉझिट जप्त तासगाव शहरातील भाजप संघटनेला आणि इच्छुक उमेदवारांना पूर्ण डावलले, पक्षाकडून आलेला निधी तळापर्यंत वाटला नाही, असाही आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील याच्यावर करण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून पूर्ण राज्यात तासगाव या एकमेव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह संपूर्ण पॅनेलचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यावर आता भाजपमधील वरिष्ठांकडून काय निर्णय घेतला जाणार, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. Local Body Election Result | हेही वाचा: राज्यसभेत आकड्यांचा खेळ बदलणार! पुढच्या वर्षी ७५ जागांसाठी होणार निवणूक ; ‘या’ प्रमुख नेत्यांचे भवितव्य अनिश्चित