MLA Shankar Mandekar: “भोर तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय” – आमदार शंकर मांडेकर
MLA Shankar Mandekar: दुर्गम व अविकसित भोर तालुक्याचा विकास करणे हे आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांनी आज केले.
Updated On:

MLA Shankar Mandekar: दुर्गम व अविकसित भोर तालुक्याचा विकास करणे हे आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांनी आज केले. भोर तालुक्यातील उत्रोली गटाचे राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे उमेदवार रणजित शिवतारे व उत्रोली पंचायत समितीच्या उमेदवार सुनिता वरे व कारी गणाच्या उमेदवार सारिका कोंढाळकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
भोर तालुका दुर्गम व डोंगराळ असल्यामुळे विकासाची गंगा या भागात पोहोचली नाही. ग्रामीण भागात अनेक प्रश्न आहे. हे प्रश्न सोडविण्याबरोबरच तालुक्याचा विकास करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार मांडेकर यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्याबरोबरच ते मुख्य रस्त्यांना जोडण्याचे काम करणार आहोत. त्यासाठी राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी भोर तालुक्याला देण्यात येत आहे. अधिकाधिक निधी आणून भोरचा कायापालट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





