मी ज्यांना सोडलं ते संपुष्टात आले, मायावती याचं उत्तम उदाहरण; मौर्य यांचा योगींना इशारा

लखनऊ – ऐन निवडणुकांच्या तोंडावर उत्तर प्रदेश सरकारमधील श्रम आणि रोजगार विभागाचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर त्यांनी बरच काळ सोबत असणाऱ्या भाजप आणि बसपा या दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली आहे.
स्वामी प्रसाद यादव यांनी मायावती यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला. स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटलं की, मी ज्यांची साथ सोडून जातो त्याचा ठावठिकाणा लागत नाही. ते संपुष्टात येतात. याचं उत्तम उधाहरण म्हणजे मायावती. एकेकाळी मौर्य यांना मायावतींचा राईट हँड समजलं जात होतं.
मायावती आंबेडकर मिशनमधून बाहेर पडल्या आणि काशीराम यांची नजर हटताच त्यांनी पक्षाचे नारे बदलले. ज्याची जेवढी भागीदारी त्याची तेवढी हिस्सेदारी हा नारा बदलून मायावतींनी ज्याची जेवढी तयारी त्याची तेवढी भागीदारी,असा नारा दिल्याचे मौर्य यांनी म्हटलं.
भारतीय जनता पक्षातील अनेक नेते कुंभकर्ण सारखे झोपले होते. माझ्या राजीनाम्यानंतर त्याची झोप उडाली आहे. भाजपमधील काही नेते विचारतात की, ५ वर्षात राजीनामा का नाही दिला. अरे मंदबुद्धी लोकांनो भाजपने या देशातील गरीब, कामगार, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्यक यांच्या डोळ्यात धूळ फेकून सत्ता स्थापन केली आहे. भलेही मी कोणत्या पक्षाची स्थापना केली नाही, पण मी कोणत्याही पक्षापेक्षा कमी नाही, असही मौर्य यांनी म्हटलं.
दरम्यान सरकार बनवण्यास मदत अल्पसंख्यानक आणि मागास वर्गीय करतात. मात्र मलाई उच्च वर्गीय खातात, हे चालणार नाही, असंही ते म्हणाले.





