जबरदस्त डायलॉग व स्टंट असणाऱ्या ‘सूर्यवंशी’चा ट्रेलर प्रदर्शित
Updated On:

मुंबई – रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ची घोषणा झाली तेंव्हापासूनच त्याबाबत दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. रोहित शेट्टीचे सगळे चित्रपट कॉप ड्रामा म्हणून फेमस असतात. अजय देवगणचा ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न्स’, रणवीर सिंहचा ‘सिम्बा’ ही त्याची चांगली उदाहरणे आहेत.
दरम्यान, आज (दि. 2) मुंबईत ‘सूर्यवंशी’चा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट उपस्थित होती. चित्रपटात बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच ‘अजय देवन’, अभिनेता ‘रणवीर सिंग’, जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री कतरीना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 24 मार्चला सूर्यवंशी जगभर रिलीज होतो आहे.





