बिहार मधील पूरबळींची संख्या आता 42
Updated On:

पाटणा – गेले काही दिवस बिहार मध्ये आलेल्या पुरामध्ये बळी गेलेल्यांची संख्या आता 42 वर पोहचली आहे. 27 सप्टेंबर ते 30 या कालावधीत विविध भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. आता बहुतेक ठिकाणचे पाणी ओसरले असल्याने स्थिती नियंत्रणात आली असली तरी अनेक ठिकाणचे पाणी अद्यापही तुंबलेलेच आहे. ते पंप लाऊन बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
सोमवार पासून या भागातील पाऊस थांबला असल्याने तेथे आता मदत आणि बचाव कार्य पुर्ण वेगाने हाती घेण्यात आले आहे. सरकारी मदत आवश्यकत्या भागात पोहचवण्याचा प्रयत्न प्रशासन व्यवस्थेकडून केला जात असून लोकांनी या बाबत संयम बाळगावा असे आवाहन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. या पुराचा एकूण सुमारे 17 लाख लोकांना तडाखा बसला आहे. पुरग्रस्त भागात गेल्या तीन दिवसांत एकूण 342 मिमी इतक्या मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.
टॅग्स:




