नगर -जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. काल रात्री उशिरा 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 534 इतकी झाली आहे. दरम्यान, आज सकाळी 22 जणांनी करोनावर मात केली. त्यांना आज डिस्जार्च देण्यात आला. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 794 इतकी झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार पारनेर तालुक्यातील 3 (साबळेवाडी 1, नांदूरपठार 1 आणि पळसपूर 1), भिंगार येथील 10, नगर ग्रामीण मधील 3 (वाकोडी 1, डोंगरगण 1), श्रीगोंदा तालुक्यातील 5 (कोळगाव 3, लोणी व्यंकनाथ 2) रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, काल रात्री 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर 12 (कुरण 2, राजापूर 1, बागवानपुरा 4, घुलेवाडी 1, सय्यदबाबा चौक 3, सुकेवाडी 1), नगर शहर 5 आणि अकोले 1 (कळंब) असे बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 361 इतकी झाली असून, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 534 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 33 रुग्ण दगावले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 794 इतकी झाली आहे.