‘या’ चार शहरातील रात्रीची संचारबंदी कायम राहणार
Updated On:

अहमदाबाद – करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गुजरात मधील ज्या शहरांमध्ये रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली होती, त्यापैकी चार शहरांतील संचारबंदी 15 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. अहमदाबाद, सूरत, बडोदा आणि राजकोट अशी या चार शहरांची नावे आहेत.
तथापि या संचार बंदीत एक तासांची कपात करण्यात आली आहे. आत्तापर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा अशी या संचार बंदीची वेळ होती ती आता रात्री अकरा ते सकाळी सहा अशी करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
ही बंदी 1 फेब्रुवारी पासून मागे घेतली जाण्याची शक्यता होती; पण ती आता मावळली आहे. दरम्यान ज्या ठिकाणी सवलती देण्यात आल्या आहेत त्या सेवा वगळून गुजरातमधील अन्य करोना निर्बंध 28 फेब्रुवारी पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णयही राज्याच्या प्रशासनाने घेतला आहे.





