पुणे जिल्हा | साडेसात एचपीच्या पुढचे वीजबिल माफ करावे

सोरतापवाडी, (वार्ताहर) – नुकत्याच झालेल्या अधिवेशनात शेतकर्यांच्या 7.5 एचपीपर्यंत वीजबिल माफ केले. त्या पुढचे वीजबिल माफ व्हावे यासाठी राष्ट्रवादी किसान सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष रोहिदास टिळेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रकाद्वारे तशी मागणी केली आहे.
रोहिदास टिळेकर यांनी याबाबत सांगितले की, चार ते पाच शेतकरी एकत्र येऊन नदी व कालव्यावरून लिफ्ट करून एकत्रित शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करतात. त्यासाठी त्या शेतकर्यांची 15 ते 20 एचपीच्या मोटर आहेत. त्यामुळे या शेतकर्यांना वीज बिल माफीत समावेश व्हावा.
अशी सर्व शेतकर्यांची मागणी आहे. तसेच या मागणीचा विचार करून येणार्या विधानसभा मतदानामध्ये आपल्याला या शेतकर्यांची नाराजी होऊ नये म्हणून आपण याचा जरूर विचार करून शेतकर्यांवर अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्यावी असे रोहिदास टिळेकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.





