जेजुरीः आजपासून २०२५ हे नवे वर्ष सुरू झाले असून यानिमित्ताने अनेककांडून देवदर्शन केले जात आहे. राज्यभरात असणाऱ्या सर्वच धार्मिक स्थळांवर भाविक देवाचे दर्शन घेऊन नव्या वर्षांचे सुरूवात करीत आहेत. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीत देखील देवाचे दर्शन घेण्यासाठी गडावर भाविकांनी गर्दी केली आहे. आज पहाटेपासूनच जेजुरी गडावर भाविकांनी गर्दी केली असून देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली आहे. दरवर्षी नव्या वर्षांची सुरूवात खंडोबा देवाचे दर्शन घेऊन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त जेजुरी गडावर दाखल होत असतात. ….म्हणून ही सोमवती उत्साहात साजरी ३० डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात सोमवती अमावस्या साजरी करण्यात आली. या दिवशी तब्बल चार लाखांहून अधिक भाविकांनी देवाचे दर्शन घेतले. देवाच्या पालखी सोहळ्याला देखील मोठी गर्दी झाली होती. वर्षांतून दर सहा महिन्यांनी सोमवती अमावस्या येत असते. मात्र, २०२५ या नव्या वर्षात केवळ एकच सोमवती आमवस्या आहे. यामुळे यंदाची सोमवती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.