Devendra Fadnavis : “आमच्याशिवाय राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही”; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट
Devendra Fadnavis : राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत दोनच व्यक्ती सांगू शकतात, असे म्हणत फडणविसांनी नावे सांगितली

Devendra Fadnavis : राज्यात सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विलनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अजित पवार हयात असताना विलनीकरणाबाबत चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर या चर्चांनी पुन्हा एकदा वेग धरला आहे.
याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. आमच्याशिवाय राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही, असे स्पष्ट फडणवीसांनी सांगितले आहे. इतकेच काय तर विलनीकरणाबाबत दोनच व्यक्त सांगू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
फडणवीस म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत फक्त दोनच व्यक्ती सांगू शकतात एक शरद पवार आणि दुसऱ्या सुनेत्रा पवार. विलिनीकरण करण्याचे जर ठरवले तर ते आम्हाला सांगतीलच, मात्र अजून तरी आम्हाला याबद्दल काहीही कळवले नाही.”
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या कामाच्या पद्धतीत फरक आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी जी भूमिका मांडली होती. तीच त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. विलिनीकरणाविषयी सुनेत्रा पवार सांगू शकतात. पण आमच्याशिवाय राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही, असेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सध्या मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा चांगला असून त्यासाठीही योग्य नियोजन केले जात आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त होईल. मात्र नदीजोड प्रकल्पांची कामे पूर्ण होण्यास सात आठ वर्षाचा कालावधी लागणार असून वाट पाहावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा:





