नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या ‘या’ स्टार प्रचाराकांची नावे जाहीर

Jammu Kashmir Assembly Election 2024 | जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणीपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत अशा मतदारसंघांबाबत, वेळेबाबत नियोजन सुरू आहे. ते काश्मिरात दोन आणि जम्मूमध्ये किमान आठ सभा घेण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींसोबतच अमित शहा, राजनाथ सिंह, स्मृती इराणी, जनरल व्हीके सिंग, कविंद्र गुप्ता, निर्मल सिंग यांना जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 40 नावे आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. Jammu Kashmir Assembly Election 2024 |
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, जी किशन रेड्डी, शिवराज सिंह चौहान, जितेंद्र सिंह यांचीही नावे आहेत. यासोबतच अनुराग ठाकूर, जयराम ठाकूर, भजनलाल शर्मा, राम माधव, तरुण चुघ, आशिष सूद, जुगल किशोर शर्मा यांचाही स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. Jammu Kashmir Assembly Election 2024 |
भाजपकडून उमेदवारांची सुधारित यादी जाहीर
44 उमेदवारांची पहिली यादी मागे घेतल्यानंतर भाजपने सोमवारी (26 ऑगस्ट) जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी दोन सुधारित याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. प्रथम 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्यानंतर दुपारी आणखी एका उमेदवाराचे नाव जाहीर केले. यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करणाऱ्या काँग्रेसनेही 9 जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. Jammu Kashmir Assembly Election 2024 |
हेही वाचा:
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला; भारतीय नौदलाने स्पष्टीच सांगितले…





