मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातून जाणार; सर्वेक्षण सुरू

सोलापूर – मुंबई -हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या सहा तालुक्यातील 62 गावातून जाणार असून उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात सामाजिक सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली आहे.
मुंबई – हैदराबाद या 721 किलोमीटर लांबीचा हाय स्पीड रेल कॉरिडॉर म्हणजेच बुलेट ट्रेन चा प्रस्ताव रेल्वे मंत्रालय भारत सरकार कडून मंजूर झाला आहे. ही बुलेट ट्रेन जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 62 गावांतून जाणार आहे.
यासाठी 17.5 मीटर रुंद जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार असून सदर जागेत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी होणाऱ्या सामाजिक परिणाम व पुनर्वसन यासाठी सध्या दोन तालुक्यातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
बुलेट ट्रेनचा मार्ग जाणाऱ्या तालुक्यातील गावांची नांवे
माळशिरस – भाबुर्डे, पळसमंडळ, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, बागेचीवाडी, गिरझणी, चोंडेश्वरवाडी, दत्तनगर, वेळापूर, उघडेवाडी, धानोरे, तोंडले.
पंढरपूर – शेंडगेवाडी, केसकरवाडी, धोंडेवाडी, सुपली, भंडीशेगांव, उपरी, गादेगांव, कोर्टी, टाकळी, कासेगांव, गोपाळपूर, अनवली, कोंढारकी, रांजणी, आंबे, सरकोली, सवतगव्हाण, पुळुजवाडी.
मोहोळ – वडदेगांव, कोथाळे, सोहाळे, वाघोली, कुरूल, कामती बुद्रुक, लमाणतांडा, कामती खुर्द, शिंगोली, तरटगांव.
उत्तर सोलापूर- तिर्हे, पाथरी, बेलाटी, कवठे, सलगरवाडी, प्रतापनगर, सोरेगांव, कुमठे.
दक्षिण सोलापूर – सवतखेड, होटगी, हणमगांव, वळसंग.
अक्कलकोट – कर्जाळ, कोन्हाळी, हसापूर, अक्कलकोट (ग्रामिण), ममदाबाद, निमगांव, हत्तीकणबस, चिक्केहळ्ळी, सलगर.





