Pune District : मुळशी धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क मुळशीकरांचा

पिरंगुट : मुळशी धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क मुळशीकरांचा आहे. नंतर बाहेर द्यायचे का नाही विचार केला जाईल. सिंबायोसिस दवाखान्यात मुळशीकरांसाठी राखीव बेड ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर मांडेकर यांनी केले.
घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथील सुंदरबन कार्यालयात मुळशी तालुका महायुतीच्या वतीने आमदार शंकर मांडेकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार मांडेकर बोलत होते. मांडेकर म्हणाले, मुळशी तालुक्यातील मतदारांच्या एकजुटीने आणि महायुतीच्या आशीर्वादामुळे आमदार झालो आहे. पुढील काळात मुळशीच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अधिकाधिक विकास साधला जाईल.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ वाघ, शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक करंजावणे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष गोविंद निकाळजे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. यावेळी माजी आमदार शरद ढमाले, राजेंद्र हगवणे, शांताराम इंगवले, बाळासाहेब चांदेरे, सुनील चांदेरे, नंदूशेठ भोईर, रविंद्र कंधारे, राजेंद्र बांदल, अमित कंधारे, सागर साखरे, लहू चव्हाण, चंदाताई केदारी, सारिका मांडेकर, वैशाली सणस, भारती विनोदे, श्रीकांत कदम, कालिदास गोपालघरे, रामचंद्र देवकर आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद ढमाले, बाळासाहेब चांदेरे, सुनील चांदेरे, अंकुश मोरे, राजाभाऊ वाघ, दीपक करंजावणे, गोविंद निकाळजे, तात्यासाहेब देवकर यांची भाषणे झाली.





