Video : चौदहवीं का चाँद.! टिश्यू सिल्क साडीत ‘माहिरा शर्मा’चा जलवा; अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हृदयाची वाढेल धडधड

Mahira Sharma : छोड्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री ‘माहिरी शर्मा’ गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये आल्यानंतर तर ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचली. माहिरा शर्मा ही मुळची जम्मू काश्मीरची आहे.
मात्र, तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत छोटी भूमिका मिळाल्यानंतर तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात झाली. तिने आतापर्यंत नागीन-3, कुंडली भाग्य, बेपनाह प्यार अशा मालिकांमध्येही तिने भूमिका केलेली आहे.
View this post on Instagram
ती ‘बजाओ’ या वेब सिरीजमध्येही दिसली होती. माहिरा शर्माचा जन्म 25 नोव्हेंबर 1997 रोजी झालेला आहे. उच्च शिक्षणासाठी ती जम्मू काश्मीरमधून मुंबई स्थायिक झाली.
ती आतापर्यंत अनेक पंजाबी गाण्यांत दिसलेली आहे. तिच्या ‘लेहंगा’ या गाण्याला विशेष प्रसिद्धी मिळालेली आहे. या गाण्याला यूट्यूबवर एक बिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत. माहिराने 50 हून अधिक संगीत व्हिडिओंमध्ये काम केले आहे.
अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून, इंस्टाग्रामवर देखील लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. नुकतंच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला यामध्ये तिचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे.
नुकतंच माहिराने बॉलिवूडमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने टिश्यू सिल्क साडी अशा प्रकारे घातली की चाहते तिच्याकडे पाहतच राहिले.
एवढेच नाही तर, रंगीबेरंगी बांगड्या आणि बॅकलेस ब्लाउजसह साडीमध्ये आकर्षक पोझ देऊन अभिनेत्रीने लोकांना घायाळ करून टाकले. तिचा या लूकमधील व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा चांगलाच भडीमार झाला आहे.
‘माहिरी शर्मा’ने सिनेविश्वात आपल्या उत्तम अभिनयाने आणि ग्लॅमर्स लूकने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करून आणि प्रेक्षकांच्या हृदयावर एक अविचल छाप सोडून तिचा स्वतःचा वारसा निर्माण केला आहे.





