पिंपरी | तर मुंबईचे मंत्रालयही गुजरातला हलवतील

खालापूर, (वार्ताहर) – जर भाजपचं सरकार आलं तर मुंबईचं मंत्रालय गुजरातला हलवतील, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केली.
कर्जत येथे आयोजित सभेत शिवसैनिकांना आवाहन करत ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात 18 हजाराचे मताधिक्य मिळाले परंतु विधानसभा निवडणुकीत 50 हजाराचे मताधिक्य घेऊन आमदार निवडून यायला पाहिजे.
आदित्य ठाकरे यांची कर्जत येथील शेळके हॉलच्या सभागृहात सभा पार पडली. यावेळी ते शिवसैनिकांना संबोधित करत होते. आदित्य ठाकरे यांचे कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसैनिक युवासैनिक व महिला आघाडीने जोरदार स्वागत करत संपूर्ण कर्जत नगरी भगवेमय केली होती. सभेचे नियोजन उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.
यावेळी उपनेते सचिन अहिर, मुंबई माजी महापौर तथा रायगड जिल्हा किशोरी पेडणेकर, लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, संपर्कप्रमुख बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, सह संपर्कप्रमुख भाई शिंदे, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, रियाझ बूबुरे, नवीन घाटवल, सुनील पाटील, बाबु घारे,
दशरथ भगत, उमेश गावंड, प्रमोद सुर्वे, प्रसाद सावंत, महिला आघाडीच्या सुवर्णाताई जोशी, रेखा ठाकरे, अनिता पाटील, करुणा बडेकर, युवासेनेचे पराग मोहिते, निखिल पाटील, प्रशांत खांडेकर, महेश पाटील, ॲड.संपत हडप, तालुका प्रथमेश मोरे, तेजस पाटील तसेच यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक व महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थिती होत्या.
आदित्य ठाकरे म्हणाले की, हे घटनाबाह्य सरकार आहे. आता आपण स्वाभिमानाची लढाई लढणार आहोत त्यात निष्ठावंत साथ देण्यासाठी सज्ज झालेत. जनतेने लोकशाही वाचवण्याचे काम लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी स्वच्छता मोहीम राबवणार.
आता आपण स्वाभिमानाची लढाई लढणार आहोत त्यात निष्ठावंत साथ देण्यासाठी सज्ज झालेत. येथील गद्दारी नष्ट करा. येणाऱ्या निवडणुकीला महायुतीचा चिखल साफ करायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामासाठी कर्जतच्या सर्व नागरिकांचे आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद करायला आलो आहे. केंद्रात आपलं सरकार पुन्हा येणार आहेत. पक्षश्रेष्ठी निष्ठावंतांच्या बाजूने ठाम उभे आहेत.
निवडणूक सोपी नाही – अहिर
उपनेते सचिन अहिर म्हणाले की, आत्ताची निवडणूक ही सोपी नसून त्यासाठी परिश्रम घेऊन एकनिष्ठेने काम करा. रायगड जिल्ह्यात आदित्य ठाकरें यांच्या नेतृत्वाखाली नवा रोजगार निर्माण करू. आपापसातील मतभेद बाजूला सारा.
आमदार विक्रमी मतांनी निवडून आणणार – सावंत
उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत म्हणाले की, लोकसभेला मी आपल्याला वचन दिले होते त्याप्रमाणे कर्जत खालापूर मधून १८ हजारांचे लीड दिले.
आज मी आपल्याला शब्द देतो, इथून आपल्या पक्षाचाच आमदार विक्रमी मतांनी निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही तसेच माझ्या कर्जत खालापूर मधील युवकांना रोजगार मिळण्यासाठी, पर्यटनाच्या माध्यमातून विकास, आरोग्य सुविधा, वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी यासाठी आम्ही आगामी काळात काम करणार आहोत.
टेबलावर नाचणाऱ्यांना खाली खेचणार – पेडणेकर
शिवसेना महिला संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, टेबलावर नाचणाऱ्याला’ खाली खेचल्याशिवाय आणि निष्ठावंत शिवसैनिकाला आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही – सत्ताधाऱ्यांनी कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या सत्तेवरून खाली उतरल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते




