‘मन उधाण वाऱ्याचे’ फेम अभिनेत्रीचे थाटात पार पडलं डोहाळजेवण

Neha Gadre | अभिनेत्री नेहा गद्रेला ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र या मालिकेनंतर ती फार अभिनय क्षेत्रात पाहायला मिळाली नाही. लग्नानंतर नेहाने अभियन सोडून पतीसोबत परदेशात स्थायिक होण्याच निर्णय घेतला. मात्र सोशल मिडियाच्या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
काही दिवसांपूर्वीच तिने लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. नुकताच तिचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
यावेळी नेहा हिरव्या रंगाच्या साडीत फारच सुंदर दिसत होती. तर तिच्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. त्याच्या कुर्त्यावर मोराचे सुंदर चित्र रेखाटलं आहे. दोघांचा हा फोटो अतिशय गोड दिसत आहे. नेहाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. आता लग्नाच्या ५ वर्षांनी ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. यासाठी नेहासह तिचा पती आणि कुटुंब नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी उत्सुक आहे.
दरम्यान, स्टार प्रवाह वरील मन उधान वाऱ्याचे या मालिकेत नेहाने गौरीची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकेतही काम केले. तर ‘मोकळा श्वास’ या चित्रपटामुळे नेहाला एक वेगळी ओळख मिळाली होती. त्यानंतर तिने 2 मार्च 2019 ईशान बापटशी विवाह केला आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. त्यानंतर ती अभिनय क्षेत्रापासून दुरावली आहे.





