Pune News : कॅनॉलमध्ये उडी मारलेल्या महिलेचा जीव वाचवला; पर्वती बीट मार्शलचे धाडस

पुणे : पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दोन बीट मार्शल पोलिसांनी कॅनॉलमध्ये उडी मारून एका महिलेचा जीव वाचवला. हा प्रकार सावरकर चौक येथे सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला.
पर्वती बीट मार्शल पो. शी. ५२१ पावर व पो. शी. १०२७ उन्हाळे हे पेट्रोलिंग करत असताना कॅनॉलजवळ एक महिला संशयास्पदरीत्या उभी दिसली. पोलिसांकडे लक्ष जाताच त्या महिलेने अचानक कॅनॉलमध्ये उडी मारली. परिस्थितीची जाणीव होताच पोलीस शिपाई पवार यांनी जीवाची पर्वा न करता कॅनॉलमध्ये उडी घेतली, तर पोलीस शिपाई उन्हाळे यांनी त्यांना व महिलेची सुरक्षितपणे बाहेर काढण्यात मदत केली.
महिलेला बुडण्यापासून वाचवून सुरक्षित बाहेर काढल्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशनचे पीएसआय अलाते यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओही पोलिसांनी पुरावा म्हणून सादर केला आहे.





