बनावट कागदपत्रे बनवून जमिन हडपली

सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

लोणी काळभोर- बनावट कागदपत्रे बनवून पुणे- सोलापूर महामार्गानजिक असलेली तीन कोटी रुपयांची 17 गुंठे हडप करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शक्‍ती डेव्हलपर्सच्या वतीने नंदलाल अडवाणी (रा. जळगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. एकनाथ भुजबळ (रा. लोणी काळभोर, ता. हवेली), वैशाली शेलार (रा. नायगाव, ता. हवेली), एकनाथ एस. देवकर (रा. हडपसर, पुणे), प्रकाश लोढे (रा. उरुळी कांचन), राजेश जवळकर, अमर गायकवाड (दोघेही रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नंदलाल अडवाणी व त्यांच्या व्यावसायिक भागीदारांनी शक्ती डेव्हलपर्सच्या माध्यमातून मेघराज करमचंदानी व विष्णूदास खानचंदानी यांच्याकडून 2008 मध्ये लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 31 मधील 53 गुंठे जागा एक कोटी एकवीस लाख रुपयांना विकत घेतली होती. मात्र 20 ऑगस्ट 2019 रोजी एकनाथ भुजबळ यांनी या जमिनीतील झाडे तोडण्याचे व जमीन सपाट करण्याचे काम सुरू केले होते. एकनाथ भुजबळ यांनी त्यावेळी फिर्यादीच्या माणसांना जमिनीत जाण्यासाठी प्रतिबंध केला.

शक्‍तीचे भागीदार संजय कालेरा व मोहन चुग यांनी भुजबळ यांना बक्षीसपत्राने ही जमीन दिली आहे, असे बनावट दस्त भुजबळ यांनी सादर करून 17 गुंठे जमीन आपल्या नावावर केली होती. हे दस्त बनावट आहेत, असे माहित असतानाही दस्त नोंदणी करताना राजेश जवळकर व अमर गायकवाड यांनी साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यानंतर भुजबळ यांनी ही जमीन वैशाली शेलार यांना विकली. हे दस्त बनावट आहेत हे माहिती असूनही देवकर व लोढे यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहेत. एकनाथ भुजबळ याने स्टम्प व्हेंडरकडून जुने स्टॅम्प मिळवून संजय कालेरा व मोहन परमानंद चुग यांचेशी मैत्रीचे सबंध व व्यावसायीक मदत केल्याचे दाखवून शक्‍ती डेव्हलपर्स फर्मचे मालकीची मिळकतीपैकी 17. 66 गुंठे क्षेत्र बोगस बक्षीसपत्राने स्वतःकडे घेतली आहे. बक्षीसपत्रामध्ये संजय कालेरा व मोहन परमानंद चुग यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×