Supriya Sule : “खरात प्रकरणाने दिल्लीत महाराष्ट्राची चेष्टा करुन ठेवली”; सुप्रिया सुळेंनी तीव्र शब्दात व्यक्त केली नाराजी
Supriya Sule :

Supriya Sule : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवंनवे कारनामे समोर येत आहेत. खरातचे अनेक बड्या राजकारण्यांसोबतचे फोटो आणि काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.
या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणामुळे दिल्लीत मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे. Supriya Sule
त्यांनी आपली खंत व्यक्त करताना म्हटले की, “खरातसारख्या प्रवृत्तींमुळे आम्हाला मान खाली घालावी लागते. खरात प्रकरण हे माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हा खूप मोठा धक्का आहे. Supriya Sule
देशात या खराताने महाराष्ट्राची चेष्टा करुन ठेवली आहे. दिल्लीत काम करत असताना बाकीच्या राज्यांमधील लोक, खासदार सातत्याने मला भेटत असतात. ते चेष्टा करायला लागलेत की तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय म्हणून. ज्या प्रकारे लोकांचे व्हिडीओ येत आहेत हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारे आहे. या सगळ्या घटनेबाबत आपण आत्मचिंतन केलं पाहिजे.”
सुप्रिया सुळे बारामतीत प्रचारासाठी जाणार का?
याशिवाय सुप्रिया सुळे यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचारासाठी जाणार का? असा सवालही करण्यात आला. त्यावर “बारामतीच्या प्रचारासाठी आम्हाला कोणतही आमंत्रण आलेलं नाही. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावे यासाठी शुभेच्छा होत्या.
शरदचंद्र पवार पक्षाने पहिल्याच दिवशी बिनविरोध करा अशी भूमिका घेतली होती. अजित पवार गेल्याच्या दुःखातून सावरलेलं नाही. अशावेळी निवडणुकीत सहकार्याची भूमिका असावी आणि बिनविरोध व्हावे अशी भावना होती. कालही हीच भूमिका होती आणि आजही असेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. Supriya Sule
हेही वाचा:






