The Kerala Story : ‘चित्रपट चांगला की वाईट हे लोकांना ठरवू द्या…’, सुप्रीम कोर्टाने ममता सरकारला फटकारले

नवी दिल्ली – ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून संपूर्ण देशभरात राजकारण सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील या चित्रपटाला विरोध दर्शवला असल्याचं पाहायला मिळालं आहे.
पश्चिम बंगालमध्ये शांतता राखण्यासाठी आणि राज्यात द्वेष व हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी वादग्रस्त “द केरळा स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. या चित्रपटावर बंदी घालणारे पश्चिम बंगाल हे पहिले राज्य ठरले आहे.
याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य सचिवांना हा चित्रपट थिएटर्समधील स्क्रीनवरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, “द काश्मीर फाईल्स’ म्हणजे काय? हा चित्रपट काश्मिरी लोकांचा अपमान करण्यासाठी होता. तसेच “द केरळा स्टोरी’ ही रंगवलेली कथा असल्याचे त्यांनी म्हटले होते.
मात्र, आता सुप्रीम कोर्टाने ममता सरकारला या निर्णयामुळे चांगलंच फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की ‘संपूर्ण देशात चित्रपट प्रदर्शित होत असताना पश्चिम बंगालमध्ये चित्रपट चांगला की वाईट हे लोकांना का ठरवू द्या”. असं त्यांनी म्हंटलं आहे.





