Actress Gauri Kishan : दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गौरी किशन तिच्या ‘अदर्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा ती चित्रपटाचे दिग्दर्शक अबीन हरिहरन आणि सह-कलाकार आदित्य माधवन यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधत होती. त्यावेळी एका पत्रकाराने तिला असा एक प्रश्न विचारला ज्यामुळे गौरी त्याच्यावर चांगलीच भडकली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने गौराला तिच्या वजनाबद्दल प्रश्न विचारला. मग वातावरण पूर्णपणे बदलले. पत्रकाराच्या प्रश्नावर तिने आक्षेप घेतला. माझे वजन तुम्हाला का त्रास देते? असा प्रतिसवाल तिने प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला केला. याचा चित्रपटाशी काय संबंध आहे? असे देखील ते म्हणाली. प्रत्येक महिलेचे शरीर वेगळे असते आणि इतर कोणालाही आपल्या शरीरावर भाष्य करण्याची परवानगी नाही. मी पात्रांवर आधारित चित्रपट करते आणि माझे काम ही माझी ओळख आहे, माझ्या शरीरयष्टीवरून नाही. त्यानंतर पुढे पत्रकाराने स्पष्ट केले की तो फक्त विनोद करत होता, तेव्हा गौरी संतापून म्हणाली मला ते मजेदार वाटले नाही. बॉडी शेमिंगची थट्टा करणे थांबवा, असे आवाहन तिने यावेळी बोलताना केले. गौरी जे काही या प्रश्नावर बोलली त्यामुळे संपूर्ण सभागृह शांत झाले. गौरी किशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहते तिला पाठिंबा देत आहेत. गायिका चिन्मयी श्रीपादाने गौरीने जे केले आहे ते कौतुकास्पद आहे. इतक्या लहान वयात अशी विचारशीलता आणि धाडस ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे, असे म्हणत गौरीला पाठिंबा दर्शवला आहे. हेही वाचा : श्रीकांत तिवारी परतला! ‘द फॅमिली मॅन 3’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; या दोन कलाकारांची एन्ट्री