Actress Amrita Khanwilkar : लावणीचा ठसका सातासमुद्रापार…! अमृता खानविलकरच्या सादरीकरणावर टाळ्यांचा कडकडाट….

Actress Amrita Khanwilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानिलवकर हिने नटरंग या चित्रपटातील वाजले की बारा या लावणीवर धरलेला ठेका डोळ्यांचे पारणे फेडणार होता. त्यानंतर अमृताने अनेक चित्रपटातून आपल्या सदाबहाराने नृत्याने अवघ्या महाराष्ट्रावर अधिराज्य केले आहे. तिचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी आतुर असतात.
आता अमृता आपल्या नृत्यकलेला घेऊन थेट सातासमुद्रापार पोहचली आहे. खरंतर अमृता खानविलकर हिचा महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच ती USA टूर वर गेली आहे. तिच्याबद्दल बोलायचे झाले तर तिने लावणीपासून क्लासिकल नृत्यापर्यंत अमृता कायमच सर्वांना भरावून सोडले आहे.
अमृताची ही पहिली USA टूर वर असल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे. यामुळे आता तिचा खास नृत्याविष्कार सातासमुद्रापार पोहचला आहे. मराठी कला आणि संस्कृती जपता यावी या संकल्पेने ‘सुंदरी’ हा शो आशिष पाटील यांनी सुरु केला आहे, याचे सादरीकरण परदेशात मोठ्या जल्लोषात करण्यात आले आहे.
View this post on Instagram
पहिल्यांदाच मी आणि आशिष पाटील अमेरिकेत ” सुंदरी ” सारखा विशेष नृत्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहोत. लावणीचा ठसका आणि कत्थकची नजाकत यांचा आगळा वेगळा संगम यातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळतोय याचा आनंद असल्याचे अमृताने सांगितले आहे.
एका अर्थाने आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला परदेशात देखील तितकीच प्रेम मिळवते याचा सगळ्यांना अभिमान वाटत आहे. येणाऱ्या काळात अमृता अनेक नवनवीन गोष्टी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला तर येणार आहे आणि प्रेक्षकांना देखील याची उत्सुकता आहे.
हेही वाचा : Ambadas Danve : महाराष्ट्रात रमीला राजमान्यता द्या, तातडीने अध्यादेश काढा; कोणी केली मागणी?





