Nagar | अवैध वाळू वाहतूक करणार्यांच्या आवळल्या मुसक्या

नगर, (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ५ लख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवानंद हनुमंत टकले, (वय १९, रा. आंबेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापुर), प्रवीण काळे, (पुर्ण नाव माहीत नाही) रा. माहीजळगाव, ता. कर्जत), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींचे नाव आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे भाऊसाहेब काळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्याकडून क्र. एम. एच. १४ बी. एम. ३१८८, तसेच ३ ब्रास वाळू असा ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस् निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार कर्जत -मिरजगाव रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.





