ऋषभ शेट्टीने चित्रपटासाठी उभारला भव्य सेट, कदंब साम्राज्य समोर आणण्यासाठी होणार सज्ज

Kantara Chapter 1 | दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटाच्या यशानंतर ‘कांतारा चाप्टर १’ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘कांतारा चाप्टर १’साठी ऋषभ शेट्टी कदंब साम्राज्याचा सेट उभारला आहे. हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील आहे. कदंब हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वपूर्ण शासक होते. त्यांनी या प्रदेशातील वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली.
हा काळ मोठ्या पडद्यावर पुन्हा निर्माण करण्यासाठी निर्माते, होंबळे फिल्म्स आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी कुंदापूर येथे कदंब साम्राज्य जिवंत केले आहे. निर्मात्यांनी या कथेला जिवंत करण्यासाठी खूप प्रयत्न केले असून अगदी चित्रपटासाठी संपूर्ण स्टुडिओ तयार करण्यापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. Kantara Chapter 1 |
सुरुवातीला, त्यांनी एक विस्तृत सेटिंग तयार करण्यासाठी ८० फूट उंचीचा एक भव्य सेट शोधला परंतु त्यांना योग्य काहीही सापडले नाही. त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे टाकून स्वतःचा स्टुडिओ बांधून सेट उभारला आहे. कदंब काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. Kantara Chapter 1 |
दरम्यान, 2022 मध्ये ‘कांतारा’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचे अनेकांंकडून कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटाने 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. यासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
हेही वाचा:
रश्मी देसाईला वयाच्या १६व्या वर्षी कास्टिंग काउचचा करावा लागला सामना





