Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाचे थैमान सुरूच आहे. पावसाचा कहर काही केल्या अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. मराठवाडा, विदर्भ या भागांना तर पावसाने तुफान झोडपले आहे. दोन दिवसांपर्वी काहीशी उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पुढच्या तीन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. या पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांनवर सडकून टीका केली आहे. सरकारडून मदतीच्या अपेक्षित बळीराजा असून या पावसाने तो पुरता हवालदिल झाला आहे. खरंतर सरकारने तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे आश्वासन बळीराजाला दिले असले तरी अनेक ठिकाणी अद्यापर्यंत पंचनामेच झालेले नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे बळीराज्याला मदत मिळण्यास उशीर होत आहे. यावर भाष्य करताना आभाळ फाटलंय, जमीन वाहून गेली आहे. अशावेळी पूर्ण मदत ही सरकारकडून व्हायला हवी. पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागलं आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे बीड, हिंगोली, जालना, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. पण यावेळी फोटोसेशेन करण्यात आल्याची टीका करण्यात आली होती. तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत केली, हे मला दाखवा याकडे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी लक्ष वेधत तुमच्याकडे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काय योजना आहेत? गमबूट घालून चार तास एक दौरा केलात आणि परत आलात. तुमचे त्या त्या भागाचे पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. नवरात्रीचे दिवस असल्याने अनेक दांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. तुम्ही पुढच्या वर्षी दांडिया करा. तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत केली, हे मला दाखवा, अशी मागणी राऊतांनी केली. आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या संपर्कात असल्याचे राऊत म्हणाले. कठोर शब्दांत राऊतांचा हल्लाबोल तुमची कोणती मदत पोहोचली हे दाखवा. आम्हाला काय विचारताय, तुम्ही काय केलं म्हणून. सरकार तुमचं आहे. भो*** सरकार आमचं आहे का, आम्हाला कसले प्रश्न विचारताय, ही हरामखोर लोक आहेत. सत्ता कोणाची आहे? सरकार कोणाचं आहे? तिजोरी कोणाच्या हातात आहे? निर्लज्जपणाचा कळस आहे, अशा कठोर शब्दांत राऊतांवर सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला. हेही वाचा : चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले; VIDEO व्हायरल