सातारकरांच्या मानगुटीवर पुन्हा एकदा करोनाचे भूत; दिवसात सापडले ‘इतके’ बाधित

सातारा (प्रतिनिधी) – आरोग्य विभागाकडे काल (शनिवार, दि. 13) रात्री आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आणखी 108 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, गेल्या 24 तासांमध्ये दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली. दरम्यान, रुग्णसंख्येने एकदम उसळी घेतल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. करोनाचे संकट अजूनही कमी झाले नसल्याने नागरिकांनी सवयभान बाळगणे गरजेचे आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात इतरत्र सात, सदरबाझार चार, गोडोली दोन, तामजाईनगर एक, खोजेवाडी आठ, लिंब तीन, वेणेगाव, कोंडवे, मालगाव, माहुली, कोडोली, संगम माहुली, नागठाणे प्रत्येकी एक, कराड तालुक्यात कराड शहर, नारायणवाडी प्रत्येकी एक, वाई तालुक्यात वाई शहर रामडोह आळी तीन, इतरत्र दोन, भुईंज, बावधन प्रत्येकी एक,
फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरात रविवार पेठ, मलठण, गिरवी नाका प्रत्येकी एक, इतरत्र सहा, कोळकी तीन, राजुरी, जाधववाडी, रेवंडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्य खटाव चार, पळसगाव, गोरेगाव प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव सात, सासुर्वे सहा, धामणेर दोन, शिवाजीनगर एक,
माण तालुक्यात दहिवडी चार, शेवरी, बिदाल प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर दोन, पाचगणी एक, खंडाळा तालुक्यात लोणंद दोन, अहिरे, शिरवळ, तांबेनगर प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात पाटण दोन,गव्हाणवाडी एक, इतर दहा, बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर, पुणे, लातूर प्रत्येकी एक, असे 108 नागरिक बाधित झाले आहेत.
दरम्यान, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना लिंब, ता. सातारा येथील 50 वर्षीय पुरुष व खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना देवडी, ता. माण येथील 78 वर्षीय पुरुष, अशा दोन बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 1839, तर बाधितांची एकूण संख्या 57 हजार 472 झाली आहे.





