कष्टाचं फळ! पडवीच्या सोहमची यूपीएससीमध्ये गरुडझेप

दौंड – यूपीएससी परीक्षेत दौंड तालुक्यातील पडवी गावच्या सोहम पांढरेने घवघवीत यश मिळवले आहे. यूपीएससी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. 30) जाहीर झाला आहे. या परीक्षेत दौंड तालुक्यातील पडवी गावच्या सोहम पांढरेने यश संपादन केले असल्याने दौंड तालुक्याची मान उंचावली आहे.
आपल्या मुलाने मिळविलेल्या यशासमोर सोहमच्या आई-वडिलांना आभाळ ठेंगणं वाटू लागलं आहे. गेली 3 वर्ष सोहम पांढरे हा जीवतोड मेहनत करत होता. अखेर आपल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान निकालानंतर सोहम पांढरे ने बोलून दाखवलं आहे.
यूपीएससीच्या अंतिम निकालात सोहमने 267 रॅंक मिळवत विजयाचा झेंडा रोवला. जिद्दीने आणि उमेदीने अभ्यास सुरुच ठेवला. परिश्रम केले की यश मिळतेच, हे त्याला माहिती होतं. त्याच जोरावर 3 वर्षातच त्याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.
लहान पणासूनच अधिकारी होण्याची त्याची जिद्द होती. त्यादृष्टीने त्याने कायम प्रयत्न केला आणि त्यास आज यश मिळाले असल्याचे ही सोहम मांढरे ने बोलताना सांगितले.





