थलपती विजयच्या शेवटच्या ‘जन नायगन’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर

Thalapathy Vijay | अभिनेता आणि नेता थलपती विजयचा शेवटचा चित्रपट ‘थलपती ६९’च्या निर्मात्यांनी फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला आहे. एच.विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनला असून या चित्रपटाचे नाव ‘जन नायगन’ ठेवण्यात आले आहे.
निर्मात्यांनी केवीएन प्रॉडक्शनच्या अधिकृत X हँडलवर विजय थलपतीच्या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. निर्मात्यांनी पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ”आम्ही याला जन नायगन, थलपथी 69 फर्स्ट लूक म्हणत आहोत.” ‘जन नायगन’च्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये थलपती विजय एका उंच स्टेजवर आत्मविश्वासाने उभा राहून समर्थकांच्या गर्दीसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत.
#JanaNayagan pic.twitter.com/cs51UDEi1Q
— Vijay (@actorvijay) January 26, 2025
थलपती विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी पारंपारिक पूजा समारंभाने सुरू झाले. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या X हँडलवर कलाकार आणि क्रू मेंबर्ससह अनेक चित्रे शेअर केली होती. सुपरस्टार थलपथी विजयच्या शेवटच्या चित्रपटाच्या नावाचा अर्थ “जननायक” असा आहे. पारंपारिक पूजा समारंभात थलपथी विजय, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि पूजा हेगडे आणि इतर कलाकार आणि क्रू सदस्य उपस्थित होते. या चित्रपटाचे शूटिंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सुरू झाले.
थलपती विजयचा ‘जन नायगन’ सिनेमा १७ ऑक्टोबर रोजी तमिळ, तेलुगू तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. थलपती विजय ‘जन नायगन’मध्ये अभिनेत्री पूजा हेगडेसह बॉबी देओल, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, नारायण, प्रियमणी, ममिता बैजू, मोनिशा ब्लेसी आणि वरलक्ष्मी सरथकुमार यांच्यासह इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा:





