ओझर : अष्टविनायक मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझरनगरीत श्री विघ्नहर्त्या गणरायाच्या जन्मोत्सव सोहळ्यामधील बुधवार दि. ४ रोजी सकाळी १०. ते ५.३० वा. पहिला पुर्वद्वार उंब्रज लक्ष्मी नारायण पूजा करून संपन्न झाला. या उत्सवामध्ये द्वार यात्रेला विशेष महत्व असून श्री गणेश भगवान आपल्या बहिणीला आणण्यासाठी चार गावामध्ये असणाऱ्या मंदिरामध्ये पालखी घेऊन जातात. या पालखी सोहळ्यात श्री क्षेत्र ओझर येथील श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ व श्री विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ सहभागी झाले होते. द्वार यात्रेत सुमारे दहा हजार भाविक सहभागी झाले होते रस्त्यावर दोन्ही बाजूने रांगोळी काढून श्री विघ्नहराच्या पालखीचे स्वागत जे सी बी ने फुलांची उधळन करुन स्थानिक ग्रामस्थ यांनी केले. या मध्ये स्थानिक मंडळे शेतकरीवर्ग यांनी द्वार यात्रेत सहभागी भाविकांना अल्पोपहार, पाणी व्यवस्था पालखी मार्गात उपलब्ध केली होती. ठीक १२.०० वा. श्री विघ्नहराच्या पालखीचे प्रस्थान महालक्ष्मी मंदिरात झाले. मंदिरामध्ये गेल्यानंतर धार्मिक विधी संपन्न होऊन तेथील ग्रामदेवता ट्रस्ट उंब्रज यांनी यांनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचा सत्कार करण्यात आला. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांनी उब्रज मधील ग्रामस्थ यांना श्री विघ्नहराच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आमंत्रण दिले. ठिक २ वा. पालखी श्री क्षेत्र ओझर च्या दिशेने पालखीचे प्रस्थान झाले ठीक ३.३० मिनिटांनी पालखीचे मंदिरात आगमन झाले मंदिरात मोरया गोसावीच्या पदांचे गायक होऊन प्रसाद वाटप करून द्वार यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना देवस्थान ट्रस्ट च्या वतीने महाप्रसादालयात खिचडीचे वाटप करण्यात येऊन पहिल्या द्वार यात्रेची सांगता झाली.