‘सैयारा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद; दोन दिवसांतच कमावला कोटींचा गल्ला

Saiyaara box office Collection | ‘सैयारा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेनं ‘सैय्यारा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
Sacnilk ने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी त्याने 20 कोटी रुपये कमावले आहे. तर दुसऱ्या दिवशी 24 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांच्या कमाईचा आकडा 45 कोटींवर पोहोचला आहे. ही कमाई कोणत्याही स्टार किडच्या डेब्यू चित्रपटाच्या ओपनिंगपेक्षा जास्त आहे.
रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट 40 ते 60 कोटींच्यादरम्यान असल्याचे म्हटले जात आहे. ज्या गतीने या चित्रपटाची कमाई सुरू आहे, ते पाहून पहिल्याच वीकेंडच्या कमाईचा आकडा 75 कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Saiyaara box office Collection |
अहान पांडे आणि अनित पड्डा या दोघांचा हा पहिला चित्रपट आहे. करिअरमधील पहिल्या चित्रपटात दोघांनी दमदार कामगिरी केली आहे. रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोहित सुरीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. Saiyaara box office Collection |
हेही वाचा :





