‘छावा’ चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज; कुठे आणि कधी पाहता येणार ?

Chhaava OTT Release Announcement | अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर लोकांच्या हृदयावरही विशेष छाप सोडली आहे.
हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची कथा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित होती, ज्यांची भूमिका विकी कौशलने साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे देशभरातून मोठे कौतुक करण्यात आले. या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.
निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख सांगितली आहे. त्यामुळे जर तुम्ही ‘छावा’ थिएटरमध्ये पाहिला नसेल तर आता तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम मोडल्यानंतर आता तो प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. ११ एप्रिलपासून हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध असणार आहे.
‘छावा’ चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स व मॅडॉक फिल्म्सने इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये ‘आले राजे आले’ असं कॅप्शन देत ‘छावा’च्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती दिली आहे.
View this post on Instagram
‘छावा’ १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात ६०० कोटींचा टप्पा गाठला आहे. तर या चित्रपटाने जगभरात ८०४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. Chhaava OTT Release Announcement |
या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने साकारली आहे. रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारख्या अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दिनेश विजान यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे. Chhaava OTT Release Announcement |
हेही वाचा:
राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





