Priyanka Chaturvedi : शिंदेसेनेतील आमदारांबाबत उबाठा गटाच्या महिला खासदार थेट बोलल्या; आमदार निवासातील मारहाण प्रकरणाविषयी म्हणाल्या..

Priyanka Chaturvedi : सध्या शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे खराब जेवण दिल्या प्रकरणी आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याचे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणी राज्य शासनाच्या अन्नप्रशासन विभागने मोठी कारवाई करत कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द केला आहे.मात्र, मारहाण केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर अद्याप काही कारवाई करण्यात आलेली नाही.
गायकवाड यांनी केलेल्या कृत्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशातच आता उबाठा गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय गायकवाड यांनी केलेल्या कृत्याप्रकरणी टीका केली आहे. तसेच शिंदेसेनेतील आमदारांबाबत त्यांनी थेट विधान केले आहे.
लोकांनी निवडून दिलेले आमदार हे सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा अधिक जबाबदार असायला हवेत. संजय गायकवाड आमदार असूनही त्यांनी परिपक्वता दाखवली नाही. ही बाब गंभीर आहे, असे चतुर्वेदी म्हणाल्या आहेत. एनडीटीव्हीशी त्यांनी याविषयी भाष्य केले आहे. स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विनोद केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी स्टुडिओत तोडफोड केली होती.
शिंदे गटाशी संबंधित असलेल्या घटनांमध्ये सातत्याने हिंसक वर्तन दिसून येत असल्याचा आरोप चतुर्वेदी यांनी केला आहे. संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल करण्यात आलेला नाही. तसेच शिंदे गटातील नेत्यांविरोधात कुणीही भाष्य करत नाही, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा : “आजचा भारत १९७५ चा भारत नाहीये…” ; इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयावरून शशी थरूर यांची टीका





