“आजचा भारत १९७५ चा भारत नाहीये…” ; इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयावरून शशी थरूर यांची टीका

Shashi Tharoor on Emergency। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीवर कडक टीका करताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भाष्ट्य केले आहे. त्यांनी याविषयी बोलताना ,”स्वातंत्र्य कसे अनेकदा हिरावून घेतले जाते हे यावरून दिसून येते” असे म्हणत त्यांनी आणिबाणीवर टीका केली. पुढे ते म्हणाले की, “आणीबाणी हे देखील दाखवते की जग ‘मानवी हक्कांच्या उल्लंघना’बद्दल कसे अनभिज्ञ राहिले.” काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी १९७५ च्या आणीबाणीवर एक लेख लिहिला आहे, ज्यामध्ये त्यांनी इंदिरा गांधींच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
लोकशाहीच्या समर्थकांनी जागरूक राहिले पाहिजे Shashi Tharoor on Emergency।
प्रोजेक्ट सिंडिकेटने प्रकाशित केलेल्या लेखात थरूर यांनी इंदिरा गांधींच्या निर्णयावर टीका केली. यावेळी बोलताना,”माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही दृष्टिकोनामुळे सार्वजनिक जीवन भय आणि दडपशाहीच्या स्थितीत ढकलले गेले” असे त्यांनी म्हटले. थरूर यांनी लिहिले की, “पन्नास वर्षांपूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीतून हे दिसून आले की, सुरुवातीला हळूहळू, चांगल्या किंवा वाईट हेतूंच्या नावाखाली, लहान स्वातंत्र्ये कशी हिरावून घेतली जातात. म्हणून, हा एक कडक इशारा आहे आणि लोकशाहीच्या समर्थकांनी नेहमीच जागरूक राहिले पाहिजे” असे त्यांनी म्हटले आहे.
थरूर यांनी पुढे, ‘इंदिरा गांधींनी आग्रह धरला की कठोर उपाययोजना आवश्यक आहेत, केवळ आणीबाणीची स्थितीच अंतर्गत अव्यवस्था आणि बाह्य धोक्यांना तोंड देऊ शकते आणि अराजक देशात शिस्त आणि कार्यक्षमता आणू शकते.’ असे म्हटले. जून १९७५ ते मार्च १९७७ पर्यंत जवळजवळ दोन वर्षे चाललेल्या आणीबाणीत नागरी स्वातंत्र्य निलंबित करण्यात आले आणि विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
पुढे ते म्हणाले की,”शिस्त आणि सुव्यवस्थेची इच्छा अनेकदा अव्यक्त क्रूरतेत रूपांतरित झाली, ज्याचे उदाहरण इंदिराजींचे पुत्र संजय गांधी यांनी चालवलेल्या जबरदस्तीने नसबंदी मोहिमांद्वारे दिले गेले, जे गरीब आणि ग्रामीण भागात केंद्रित होते, जिथे मनमानी लक्ष्ये साध्य करण्यासाठी जबरदस्तीने आणि हिंसाचाराचा वापर केला जात होता”
आणीबाणीच्या काळात हजारो लोक बेघर Shashi Tharoor on Emergency।
थरूर यांनी,”दिल्लीसारख्या शहरी केंद्रांमध्ये झोपडपट्ट्यांचे निर्दयीपणे पाडाव केल्याने हजारो लोक बेघर झाले आणि त्यांच्या कल्याणाची काळजी घेतली गेली” असे म्हटले. त्यांनी लिहिले की,”आणीबाणीने लोकशाही संस्था किती नाजूक असू शकतात याचे एक ज्वलंत उदाहरण दिले, अगदी ज्या देशात त्या मजबूत दिसतात तिथेही. याने आपल्याला आठवण करून दिली की सरकार ज्या लोकांची सेवा करण्याचा दावा करते त्यांच्याप्रती त्यांची नैतिक दिशा आणि जबाबदारीची भावना गमावू शकते.”
थरूर यांनी लिहिले की, “आणीबाणीने दाखवून दिले की स्वातंत्र्य कसे अनेकदा कमी केले जाते, सुरुवातीला थोडेफार स्वातंत्र्य हिरावून घेतले जात होते आणि नंतर ‘कुटुंब नियोजन’ आणि ‘शहरी नूतनीकरण’ जबरदस्तीने नसबंदी आणि मनमानी घरे पाडण्याचे रूप घेते.”
आजचा भारत अधिक मजबूत
त्यांच्या लेखात, थरूर म्हणाले की,”आजचा भारत १९७५ चा भारत नाही. आपण अधिक आत्मविश्वासू, अधिक समृद्ध आणि अनेक प्रकारे मजबूत लोकशाही आहोत. तरीही आणीबाणीचे धडे चिंताजनकपणे प्रासंगिक आहेत. सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा, टीकाकारांना शांत करण्याचा आणि संवैधानिक सुरक्षा उपायांना टाळण्याचा मोह अनेक स्वरूपात उद्भवू शकतो.” ते म्हणाले की, “या अर्थाने, अनेकदा राष्ट्रीय हित किंवा स्थिरतेच्या वक्तृत्वात, आणीबाणी एक मजबूत इशारा म्हणून काम करते आणि लोकशाहीच्या समर्थकांनी नेहमीच जागरूक राहिले पाहिजे”





