बॉलिवुडमधील स्टार अभिनेता गोविंदाने नुकताच आपला 56वा वाढदिवस साजरी केला. यानिमित्त त्यांची मुलगी आणि अभिनेत्री टीना आहूजा हिने आपल्या वडिलांना खास शुभेच्छा दिला. यावेळी तिने अनेक खुलासे करत वडिलांप्रती असलेले प्रेम व्यक्त केले.
टीना आहूजा म्हणाली, डॅड मला प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणासाठी प्रेरित करत असतात. हे सांगणे मला खूपच कठीण आहे. त्यांची कामाप्रती असलेल्या प्रामाणिकतेपासून जीवनातील कोणत्याही परिस्थितीत संयम राखणे आदी गोष्टी मला सतत प्रेरणा देत असतात. एक व्यक्ती म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व खूपच वेगळे आहे, जे मला सर्वाधिक आवडते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून मला एक नवीन उर्जा मिळते.
दरम्यान, टीना आहूजाने “सेकंड हॅंड हज्बंड’ या कॉमिडी चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यू केले होते. याशिवाय 2016मध्ये तिची “बेस्ट न्यू फेस ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. टीना आहुजाचे नुकतेच एक गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे गजेंद्र वर्मा यांनी गायिले होते आणि ते स्वःत ऑनस्क्रिन झळकले होते.