कृषिकन्यांनी रांगोळीतून साकारले हातवे गाव

भोर- डोंगररांगात वसलेले टुमदार गाव…, गावाच्या वेशीपासून खळखळत वाहणारे ओढे, नदी, नाले…, सभोवतली असणारी भातखाचरांची हिरवीगार शेती… अशा नानाविध रूपाने कृषिकन्यांनी रांगोळीतून हातवे बुद्रुक (ता. भोर) गावचा हुबेहूब नकाशा साकारला आहे.

पुणे कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या निकिता बांदल, तेजस्विनी भिंगारे, अनुराधा मरकड, प्रज्ञा खेसे पल्लवी कंठे, मयुरी कोदरे, पूजा वर्पे, कोमल वेंदे यांनी हातवे बुद्रुक येथील हनुमान मंदिरात नुकतेच शेती प्रदर्शन भरवून पिंकामधील अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे, चारसूत्री भात लागवड, किटकनाशके फवारताना घेण्याची काळजी, क्षारयुक्त जमिनीचे व्यवस्थापन, मृद संवर्धनसह पशुधनाच्या जाती व फायदे याबाबत मागर्दर्शन केले. यावेळी माजी उपसभापती लहु शेलार, सरपंच आशा जामदार, उपसरपंच हनुमंत भिलारे, सीता खुटवड, उषा जाधव, गौरव जामदार, निलेश जुगधर, दत्तात्रय थिटे, सोपान जामदार, मनोज जाधव, दीपक जामदार आदींनी कृषिकन्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. केंद्रप्रमुख ए. बी. कांबळे, कार्यक्रम अधिकारी श्रद्धा बगाडे यांचे कृषिकन्यांना मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.