आयुष्यमान खुरानासोबत ‘दायरा’मध्ये झळकणार प्रसिद्ध अभिनेत्री

Ayushmann Khurrana| अभिनेता आयुष्मान खुरानाने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. देशभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. चाहते ही त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. 2012 मध्ये रिलीज झालेल्या ‘विकी डोनर’ चित्रपटातून डेब्यू केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. आता पुन्हा एकदा तो आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या ‘दायरा’ चित्रपटात आयुष्मान खुरानाने दिसणार आहे. या चित्रपटात तो एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. मेघना गुलजारच्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे. करीना कपूर आणि आयुष्मान खुराना एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तरमेघना ‘तलवार’, ‘राझी’, ‘साम बहादूर’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखली जाते.
‘दायरा’ हा चित्रपट 2019 च्या हैदराबादच्या दुःखद आणि घृणास्पद घटनेवर आधारित एक थ्रिलर ड्रामा चित्रपट असल्याचे म्हटले जाते. ज्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. मात्र, हाचित्रपट अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होण्यास सज्ज होण्याची शक्यता आहे. Ayushmann Khurrana|
दरम्यान, अलीकडेच करीना कपूर नुकतीच ‘क्रू’ चित्रपटात झळकली होती. तर आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. या चित्रपटाने जगभरात 140 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात तो पूजाच्या भूमिकेत दिसला होता, ज्यासाठी त्याला प्रेक्षकांकडून दादही मिळाली होती.
हेही वाचा:
शेअर बाजाराचा ऐतिहासिक उच्चांक ; निफ्टीने प्रथमच 23,500 चा टप्पा केला पार





