‘डॉन 3’मध्ये रणवीर सिंहसोबत दिसणार प्रसिद्ध अभिनेता; खलनायकाची साकारणार भूमिका

Don 3 Film | बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ सिनेमाच्या यशानंतर दुसऱ्या भागात शाहरुख खानने मुख्य भूमिका केली होती. यानंतर आता ‘डॉन 3’मध्ये रणवीर सिंहच्या पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आता या सिनेमातील आणखी एक अपडेट समोर आली आहे. यात सुप्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
छोट्या पडद्यावरून करिअरची सुरूवात करणारा अभिनेता विक्रांत मॅसी ‘डॉन ३’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘सेक्टर ३६’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर विक्रांत मॅसी आता मोठ्या पडद्यावरही खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. यानंतर निर्माते विक्रांत मॅसीच्या नावाचीही घोषणा करू शकतात.
View this post on Instagram
याआधी रणवीर आणि विक्रांतने ‘लूटेरा’ आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र, या दोन्ही चित्रपटांमध्ये विक्रांतने सहाय्यक भूमिका साकारली होती. मात्र आता तो रणवीरसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
विक्रांत शेवटचा ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात दिसला होता. त्याआधी त्याने ‘सेक्टर ३६’ या ओटीटी चित्रपटात दमदार अभिनय साकारला होता. त्याच्या ’12th फेल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाला मोठे यश मिळाले होते. यानंतर आता विक्रांत एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा:





