“निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंब “तहात” जिंकण्याचा प्रयत्न”; ठाकरे बंधुंच्या मेळाव्यानंतर भाजपची प्रतिक्रिया समोर

Ashish Shelar | हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर आज शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधु अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एकाच मंचावर पाहायला मिळाले.
यावेळी राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले आहेत. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. तसेच भाषेसाठी नाही ही तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी असल्याचं म्हणत भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता ‘भाऊबंदकी’ आठवल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. Ashish Shelar |
भाषेसाठी नाही ही तर.. निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी !
महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता “भाऊबंदकी” आठवली… ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता.
भाषेचे प्रेम वगैरे काही…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 5, 2025
आशिष शेलार काय म्हणाले?
“भाषेसाठी नाही ही तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी!, महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता ‘भाऊबंदकी’ आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच!”
“महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार, त्यासाठी सत्ता…यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरें यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे…निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंब “तहात” जिंकण्याचा प्रयत्न !!”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. Ashish Shelar |
हेही वाचा:
Raj Thackeray : प्रश्न, इशारा, टोला अन्…..; राज ठाकरेंच्या भाषणातील ४ आक्रमक मुद्दे जाणून घ्या…





