Coromandel Express Accident : प्रत्यक्षदर्शीने सांगितलं,’कुणाचे हात तर कुणाचे पाय… रक्तबंबाळ शरीर… तुम्हीही सुन्न व्हाल’

Odisha Train Accident – ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी 2 जून रोजी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींनी या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर गोवा-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे कामकाज रद्द करण्यात आल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
#WATCH हम S5 बोगी में थे और जिस समय हादसा हुआ उस उस समय मैं सोया हुआ था… हमने देखा कि किसी का सर, हाथ, पैर नहीं था… हमारी सीट के निचे एक 2 साल का बच्चा था जो पूरी तरह से सुरक्षित है। बाद में हमने उसके परिवारिजन को बचाया: हादसे के बारे में बताते हुए कोरोमंडल एक्सप्रेस का एक… pic.twitter.com/0Ni3WR1Lwy
— ANI_HindiNews (@AHindinews) June 2, 2023
अपघातानंतर घटनास्थळी कशी परिस्थिती होती हे प्रत्यक्षदर्शीने माध्यमांशी बोलतांना सांगितले की, ‘मी कोरोमंडल एक्सप्रेसने प्रवास करत होतो. आम्ही S5 बोगीत होतो. अपघात झाला तेव्हा मी झोपेत होतो. कुणालाचे डोके, तर कुणाचे हात किंवा पाय नव्हते असे आम्ही पाहिले. आमच्या सीटखाली एक दोन वर्षांचा मुलगा होता जो पूर्णपणे सुरक्षित होता. नंतर आम्ही त्याच्या कुटुंबीयांची सुटका केली.’
TMC खासदार डोला सेन म्हणाल्या, ‘माझ्या आयुष्यात इतका दुर्दैवी अपघात मी कधीच पाहिला नाही. दोन्ही पॅसेंजर गाड्या भरल्या होत्या. दोन्ही गाड्यांमध्ये मिळून 3000-4000 लोक असण्याची शक्यता आहे.’
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे. एका ट्विटमध्ये पंतप्रधानांनी लिहिले की, ‘ओडिशातील रेल्वे अपघातामुळे मी व्यथित झालो आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. जखमी लवकर बरे होवोत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. दुसरीकडे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी ओडिशा रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे.’





