“बिपाशा आणि करणसोबत काम करण्याचा अनुभव फार भयानक होता”; मिका सिंगचा खुलासा

Mika Singh | गायक आणि संगीतकार मिका सिंगने एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. मिकाने बिपाशा आणि करणसोबत ‘डेंजरस’ नावाचा चित्रपट केला होता. तो त्या सिनेमाचा निर्माता होता. यामध्ये बिपाशा आणि करण यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यांच्यासोबत काम करताना अत्यंत नकारात्मक अनुभव आल्याचा खुलासा मिकाने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
मुलाखतीत मिका म्हणाला, “मला करण सिंह ग्रोवरसोबत एका नव्या अभिनेत्रीला घ्यायचं होतं, जेणेकरून प्रोजेक्टचा बजेट कमी असेल आणि त्यातून काहीतरी चांगलं काम करता येईल. पण अचानक बिपाशा बासू आम्ही दोघं या सीरिजमध्ये काम करू शकतो, असे म्हणाली. पण त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच भयानक होता.” Mika Singh |
मिकाने पुढे सांगितलं, “मी 50 लोकांच्या टीमसोबत लंडनला शूटिेंगसाठी गेलो होतो. तिथे आम्ही महिनाभर शूटिंग करणार होतो. पण हा कालावधी वाढून दोन महिन्यांचा झाला. शूटिंगदरम्यान करण आणि बिपाशाने खूप ड्रामा केला. ते विवाहित होते, म्हणून मी त्यांच्याशी एकच रुम बुक केली होती. पण तरीसुद्धा त्यांनी दोन वेगवेगळ्या रुम्सची मागणी केली. मला त्यामागचं लॉजिक काही समजलं नाही. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट होण्याची मागणी केली. आम्ही तीसुद्धा मागणी ऐकली.” Mika Singh |
सीरिजमधील एका स्टंटच्या शूटिंगदरम्यान करणचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर त्यांनी डबिंग करतानाही बऱ्याच समस्या निर्माण केल्याचं मिकाने सांगितलं. “आमचा घसा खराब आहे, यांसारखी त्यांनी विविध कारणं दिली. मला त्यांचा ड्रामाच समजत नव्हता. त्यांना त्यांच्या कामासाठी पैसे सुद्धा देण्यात आले होते. तरीसुद्धा त्यांनी काम नीट पूर्ण केलं नव्हतं. खऱ्या आयुष्यात दोघं पती-पत्नी असूनसुद्धा त्यांनी ऑनस्क्रीन रोमॅंटिक सीन करण्यासाठीही ड्रामा केला होता”, असाही खुलासा मिकाने केला.
“सलमानने त्याला असेही सांगितले की, तू चित्रपटात ज्या लोकांना घेत आहेस त्यापेक्षा तू स्वत: जास्त लोकप्रिय आहेस. तू स्वतः चित्रपटात ये. पण मिकाने त्याचे ऐकले नाही आणि निर्माता होण्याचा निर्णय घेतला. या छोट्या गोष्टी होत्या ज्यांनी मोठा प्रभाव पाडला. त्यानंतर मी कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करणार नाही असे म्हणत कानाला खडा लावला,” असेही मिकाने सांगितले.





