इंदापूरचे संपूर्ण कुटुंब करोनामुक्त
Updated On:

रेडा -इंदापूर शहरातील एकाच कुटुंबातील 10 बाधितांनी करोनावार मात करीत बुधवारी (दि. 24) घरी परतले. त्यांचे राज्यमंत्री, नगपरिषद, आरोग्यविभाग, नागरिकांच्या वतीने फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, नगराध्यक्षा अंकिता शहा, वैद्यकीय अधीक्षक एकनाथ चंदनशिवे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, मुकुंद शहा, कैलास कदम, विठ्ठल ननवरे, श्रीधर बाब्रस, राजेंद्र चौगुले उपस्थित होते.
आता इंदापूर शहरांमध्ये एका रुग्णावर तर पुण्यात दोघांवर उपचार सुरू आहेत. यापैकी इंदापुरात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला दोन ते तीन दिवसांमध्ये घरी सोडण्यात येईल, अशी माहिती डॉ. चंदनशिवे यांनी दिली.





