“संपूर्ण देश आणि लष्कर मोदींच्या चरणी नतमस्तक”; मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे नवा वाद

DCM Jagdish Devda | पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेद्वारे पाकिस्तानला मोठा धडा शिकवला. मोठ्या कामगिरीनंतर देशभरातून भारतीय सैन्याचे कौतुक करण्यात आले. मात्र काही दिवसांपूर्वीच कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत मध्य प्रदेशातील मंत्री आणि भाजपचे नेते विजय शाह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली.
त्यानंतर विजय शाह यांनी माफी मागत आपला तसा कुठलाही हेतू नसल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यांचे विधान चीड येणारे होते. एकीकडे हा वाद सुरू असतानाच यातच आता मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
देवडा यांची पदावरून हकालपट्टी करण्याची काँग्रेसकडून मागणी
संपूर्ण देश आणि लष्कर हे पंतप्रधान मोदी यांच्या चरणी नतमस्तक झाले असल्याचे विधान त्यांनी जबलपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर्सच्या प्रशिक्षण कार्यक्रमात केले. ‘‘आम्ही पंतप्रधान मोदी यांचे आभार मानू इच्छितो. सगळा देश आणि लष्कर हे त्यांच्या पायी नतमस्तक झाले आहे, मोदींनी जे उत्तर दिलंय, त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असे विधान देवडा यांनी केले. देवडा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांची तातडीने पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. DCM Jagdish Devda |
“इस देश की सेना और सैनिक प्रधानमंत्री मोदी के चरणों में नतमस्तक हैं”
~ मध्यप्रदेश BJP के उपमुख्यमंत्री जगदीश देवड़ा
यह सेना के शौर्य पराक्रम का घोर अपमान है. माफ़ी से काम नहीं चलेगा
इस आदमी को तो आपको बर्खास्त करना ही पड़ेगा मोदी जी – घटिया, बेहद घटिया घिनौनी सोच है यह pic.twitter.com/j15xMzGB6s
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) May 16, 2025
विजय शाह यांचे वादग्रस्त विधान
मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. “ज्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल,” असे विजय शाह यांनी म्हटले होते.
दरम्यान,विजय शाह यांच्यानंतर आता मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.DCM Jagdish Devda |
हेही वाचा:
राज्यातील १२ अपर आयुक्तांच्या बदल्या; पुण्याच्या पंकज देशमुखांसह अनेकांना बढती, वाचा संपूर्ण यादी…





