Upcoming Ott Release 2025 : नव्या वर्षात मनोरंजन होणार खास… धमाकेदार सिरीजचे नवे सीजन प्रेक्षकांच्या भेटीला..

२०२४ हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी संमिश्र स्वरुपाचं राहिलं. थिएटर्समध्ये अनेक मोठे सिनेमे रिलीज करण्यात आले. काही सिनेमांनी तर बॅाक्स अॅाफिसवर अक्षरःशहा धूमाकूळ घातला. या स्पर्धेत ओटीटी कसं मागे राहिन.. ओटीटीवर स्ट्रीम झालेल्या अनेक सिरीजनी प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली. आता नव्या वर्षात लोकप्रिय झालेल्या विविध सिरीजचे नवे सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाताललोक, फॅमिली मॅन ३ आणि सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेली स्ट्रेन्जर थिंग्स या सिरीजचे नवे सिजन नव्या वर्षात रिलीज करण्यात येणार आहेत. यामुळे या सिरीजच्या पुढच्या सिजनची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे.
पाताललोक २ः नेटफिल्क्सवरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या सेक्रेट गेम्स या सिरीजनंतर त्यानंतरच्या काळात अॅमेझॅान प्राईमवरील पाताललोक वेबसिरीजने प्रेक्षकांची दाद मिळवली. या सिरीजमधील अभिनेता जयदीप इहलावतने साकारलेला पोलीस अधिकारी हाथराम चौधरी भाव खाऊन गेला. हे पात्र प्रेक्षकांच्या मनाशी एकरुप झालं होतं. सिरीजमधील क्राईम सस्पेन्स थक्क करणारा होता. आता या सिरीजचा दुसरा सिजन जानेवारीत प्राईमवर स्ट्रीम करण्यात येणार आहे.
फॅमिली मॅनः प्राईमवरची अजून एक अत्यंत लोकप्रिय सिरीज म्हणजे फॅमिली मॅन. ओटीटीला सेन्सार नसल्याने त्या ठिकाणी बंधन येत नाहीत. मात्र, फॅमिली मॅन ही सिरीज फॅमिलीसोबत बसून पाहण्याची सिरीज ठरली. या सिरीजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याने साकारलेला श्रीकांत तिवारी हा अफलातून होता. या सिरीजला मोठ्या प्रमाणावार उचलून धरण्यात आले. या सिरीजचे दोन सीजन येऊन गेलेले आहेत. याचा तिसरा सिजन नव्या वर्षांत प्राईमवर स्ट्रीम करण्यात येणार आहे.
स्ट्रेन्जर थिंग्सः नेटफिल्सवरील अनेकांची पसंतीची सिरीज म्हणून स्टेन्जर थिंग्स या सिरीजकडे पाहिले जाते. या सिरीजेचे तब्बल ४ सीजन्स या अगोदर स्ट्रिम झालेले आहेत. या सिरीजचा पाचवा आणि बहुप्रतेक्षित सीजन नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर या सिरीजची जोरदार चर्चा करण्यात येत होती. सस्पेन्स थ्रीलर आणि अॅडव्हेन्सचर कॅटेगिरीत असलेली या सिरीजने एक वेगळीच जादू प्रेक्षकांवर केली आहे.
बहुचर्चित मटका किंग….
दिग्दर्शक नागराज मुंजळे हे त्यांच्या खशाबा या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच या सिनेमाचं शूटिंग संपणार असून मुंजळे आपला मोर्चा मटका किंग या सिनेमाकडे वळवणार आहेत. या सिनेमात अभिनेता विजय वर्मा याची मुख्य भूमिका असणार आहे. त्याच्यासोबत मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधव हे देखील दिसणार आहेत.


