Sai Tamhankar with Vijay Verma : विजय वर्मासोबत मराठमोळी सई ताम्हणकर शेअर करणार स्क्रीन
Sai Tamhankar with Vijay Verma : 'मटका किंग'चं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती नागराज मंजुळे यांनी केली आहे.

Sai Tamhankar with Vijay Verma : अभिनेता विजय वर्मा ‘मटका किंग’ या वेब सीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील दिसणार आहे. नुकतेच या सीरिजचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. सध्या या इव्हेंटमधील दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या इव्हेंटसाठी विजय वर्माने खास लूक केला होता. तर सई निळ्या रंगाच्या साडीत दिसून आली. यावेळी दोघांनीही पापाराझींना कॅमेऱ्यासमोर खास पोज दिल्या. सई ताम्हणकरकडे बघून विजय वर्मा फोटोसाठी खास पोझही देत असल्याचे व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळाले.
View this post on Instagram
‘मटका किंग’ या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये त्याने ब्रिज भट्टी ही भूमिका साकारली आहे. तर सई ताम्हणकर बरखा म्हणून त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
‘मटका किंग’च्या ट्रेलरमध्ये सई आणि विजय वर्माची झलक पाहायला मिळाली. या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा आणि सईने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.
‘मटका किंग’चं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती नागराज मंजुळे यांनी केली आहे. येत्या १७ एप्रिलपासून ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
Khas Khas Sharbat: उन्हाळ्यात थकवा- अशक्तपणावर रामबाण उपाय! खसखस देईल नैसर्गिक एनर्जी





