Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या उमेदवार, कार्यकर्ते यांच्यावर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर प्रशासनाकडून मतदानाच्या दिवशी विशेष खबरदारी घेतली जात आहे. बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान सुरू असताना काही ठिकाणी काही किरकोळ वाद झाल्याचेही प्रकरण समोर आले आहेत. परळी विधानसभा मतदार संघात काहीसा वाद झाला आहे. परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना ऍडव्होकेट माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली आहे. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत. Maharashtra Assembly Election 2024 | दुपारी १२ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते माधव जाधव हे बुथ पाहणी करण्यासाठी शहरातील बँक कॉलनी परिसरात गेले असता तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माधव जाधव यांना मारहाण केली. यामुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यावरुन आता बीडच्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला आहे. Maharashtra Assembly Election 2024 | घाटनांदुरमध्ये मतदान केंद्रात तोडफोड राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळीमध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घाटनांदुर मधील मतदान केंद्रामध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून तोडफोड करण्यात आली त्यामुळे काही काळ मतदान थांबवण्यात आले. हेही वाचा: राज्यात दुपारी १ पर्यंत ३२.१८टक्के मतदान ; तुमच्या जिल्ह्यात किती टक्के झाले मतदान ? वाचा सविस्तर