Pune District | शहरात पहाटेच्या थंडीचा पारा १० अंशापर्यंत खाली उतरला
Updated On:

पुणे,– शहरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. गुरूवारी (दि. २१) शहरातील एनडीए परिसरात हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. शहरातील पारा १० अंशापर्यंत खाली आला असून आज सकाळी दहानंतर थंडी जाणवत होती.
शहरात थंडीचा जोर वाढल्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. घराबाहेर पडताना स्वेटर, कानटोपीचा वापर करीत आहेत. मागील तीन दिवसांपूर्वी १३ ते १४ अंशावर असलेले कमाल तापमान आज १० अंशापर्यंत खाली आले.
त्यामुळे रात्री आणि पहाटे कडाक्याची थंडी जाणवत आहे. धुकेही मोठ्या प्रमाणात पसरत असून पुढील दोन ते तीन दिवस शहरातील हवामान कोरडे राहील. तर थंडीचा जोर कायम राहील. सकाळी धुके पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
शहरातील किमान तापमान
एनडीए – १०.८, हवेली ११.१, तळेगाव – ११.५, बारामती – ११.८, शिवाजीनगर १२.२, पाषाण – १२.६,





